ताज्या घडामोडी

औंढोलीत श्री वाघोबा देवाचे मंदिरात व श्री जाखमाता देवीचे मंदिरात साधेपणाने घटस्थापना

लोणावळा : औंढोलीत श्री वाघोबा देवाचे मंदिरात व श्री जाखमाता देवीचे मंदिरात साधेपणाने घटस्थापना करण्यात आली. राज्यशासनाने कोविड साथरोग आटोक्यात आल्यानंतर घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्याचे आदेश व मंजुरी दिल्याने भाविक भक्तांमधे समाधान आहे.

औंढोली येथील ग्रामदैवत श्री वाघोबा व श्री जाखमाता देवीचे मंदिरात आज भाविक व महिला आणि लहान मुले यांचे उपस्थितीतीत घटस्थापना झाली. आरतीनंतर भाविक प्रसाद व दर्शन घेवून घरी गेले. घटस्थापना निमित्ताने दोन्हीही मंदिरातआकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली होती.ढोल ताशा माञ न वाजवता साधेपणाने घटस्थापना झाल्याने मंदिराचे परिसरात शांतता व उत्साही वातावरण होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!