ताज्या घडामोडी
तळेगावातील दुर्गामाता मंदिरात कन्यापूजन संपन्न
तळेगाव : येथील दुर्गामाता मंदिरात दुसऱ्या माळे निमित्त कन्या पूजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
यावेळी भजनाचा कार्यक्रम कुलकर्णी यांनी सादर केला. सायंकाळी आरती सुशिला हिरालाल परदेशी आणि पी. आय. दशरथ परदेशी यांच्या हस्ते पार पडली.
देवीचे गोंधळी हरीश ढेंबे यांनी देवीची आरती केली. त्यानिमीत्ताने सर्व महिलांनी हिरव्या सांड्या परिधान केल्या होत्या.
कार्यक्रमाचे नियोजन दुर्गा माता मंदिर भोई आळी तळेगाव दाभाडे यांनी केले.यावेळी कार्यक्रमास परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.