ताज्या घडामोडी

सोमवारपासून महाविद्यालये व पर्यटनस्थळे सुरू

पुणे : जिल्ह्यातील महाविद्यालये व पर्यटन स्थळे सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.

विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू होणार असून दोन डोस झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यास परवानगी असेल. तर शहराबाहेरील किंवा परराज्यातील विद्यार्थ्यांना कोरोनाची RTPCR चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश मिळणार नाही असे अजित पवार म्हणाले.

पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी सर्व महाविद्यालय सोमवारपासून खुली होणार आहेत. या निर्णयामुळे कॉलेजकुमारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पर्यटन स्थळेही सुरू होणार-

महाविद्यालया सोबतच पुणे शहर व ग्रामीण भागात पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यात येणार आहे. कोरोना रुग्णांची घटती रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!