ताज्या घडामोडी

अजित पवारांवर कारवाई केल्यास भाजपच्या नेत्यांना तालुक्यात फिरुन देणार नाही – बबन भेगडे

मावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या निकटवर्तीयांवर करण्यात येणाऱ्या कारवायांच्या निषेधार्थ मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी तालुकाध्यक्ष बबन भेगडे बोलत होते.यावेळी तीव्र शब्दांत भाजपचा निषेध करत अजित पवारांवर जर कारवाई करण्यात आली तर भाजपच्या नेत्यांना तालुक्यात फिरुन देणार नाही असा इशारा तालुकाध्यक्ष बबन भेगडे यांनी दिला.

 

यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष भेगडे म्हणाले की, अजित पवार खंबीरपणे नेतृत्व करत असून जनसामान्यांचे प्रश्न सोडवत आहे. सहकार क्षेत्र व शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे . अजित पवारांची जाणीवपूर्वक बदनामी करून राष्ट्रवादीचे खच्चीकरण करण्याचा केंद्र सरकारचा कुटील डाव आहे .महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात या प्रकाराने वेदना उमटत आहेत. पवारांवरील सर्व आरोप खोटे आहेत. तालुक्यातील भाजपचे नेते ही कुस्तीकपणे काम करणारी नादान मंडळी आहेत. भाजपचे तालुक्यातील पुढारी सत्तेच्या लालसेपोटी आणि वैयक्तिक आकसापोटी काम करतात.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. अजित पवारांवर करण्यात येत असलेली कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात  सहभागी झाले होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!