ताज्या घडामोडी

जागतिक टपाल दिन लोणावळा पोस्ट कार्यालयात साजरा

लोणावळा : येथील पोस्ट कार्यालयात (9 ऑक्टोबर) जागतिक टपाल दिन मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

त्यानिमित्ताने पोस्टात येणा-या सर्व ग्राहकांना गुलाबपुष्प व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमावेळी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी पोस्टाच्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच लोणावळा नगरपरिषदेच्या सहकार्याने घरोघरी सुकन्या योजना राबवणार असल्याचे आश्वासन दिले. सब पोस्ट मास्तर भारती गवळी यांनी पोस्टाच्या विविध योजनांबाबत माहिती दिली.

उपस्थितांचे आभार विवेक थोरवे यांनी मानले.

यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, सामाजिक कार्यकर्ते धीरूभाई टेलर, त्यांच्या सुविद्य पत्नी, मनशक्ती केंद्राचे वैद्य, डॉ. अतूल गडकरी, पत्रकार विशाल विकारी, नितीन तिकोणे, संतोष सरदेशमुख , भारती गवळी व पोस्टाचे कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!