ताज्या घडामोडी

लखीमपूर हत्याकांड प्रकरणी महाविकासआघाडीचा मोर्चा ; लोणावळ्यात कडकडीत बंद

बंदला लोणावळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणावळा : लखीमपूर हत्याकांड प्रकरणी महाविकासआघाडीचा मोर्चा काढून लोणावळ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवसेना , राष्ट्रवादी व काँग्रेस आय या महाविकासआघाडीमधील शहराध्यक्ष , नगरसेवक , नगरसेविका व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चामधे सहभागी झाले होते. लोणावळा शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा असलेली औषधे दुकाने व्यतिरिक्त सर्व दुकानदारांनी व भाजीमंडईतील व्यापारी यांनी दुकाने बंद ठेवून तीव्र निषेध नोंदवला.

शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे ,शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, काँग्रेस चे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड , काँग्रेस आयचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कविश्वर,काँग्रेस च्या गटनेत्या आरोही तळेगावकर , उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल , शिवसेना वाहतूक सेना जिल्हा आध्यक्ष महेश केदारी , महिला आघाडी संघटिका शादान चौधरी , नगरसेविका कल्पनाताई आखाडे ,राष्ट्रवादी काँग्रेस प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, जिल्हा उपाध्यक्ष राजूभाऊ बोराटी , राष्ट्रवादी काँग्रेस चे शहराध्यक्ष जीवन गायकवाड , काँग्रेस चे व्यापारी सेल कार्याध्यक्ष संतोष सरदेशमुख , हमाल पंचायत कष्टकरी कामगार पंचायत आध्यक्ष राजाराम साबळे , तसेच पदाधिकारी मनिषा भांगरे आदी उपस्थित होते.

यावेळी अनेक पदाधिकारी यांनी भाषणातून केंद्र व उत्तरप्रदेश मधील मंञ्याचा व त्याचे मुलाचा निषेध केला. यावेळी शेतकरी विरोधी कायदे , कामगार विरोधी कायदे , पेट्रोल , डिझेल , वाढती महागाई यांचे विरोधात घोषणा देवून भाषणातून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे म्हणाले , उत्तरप्रदेश मधील लखीमपूर मधे शेतकरी आंदोलन चिरडून पळून गेलेल्या मंञ्याचे मुलाला आटक करण्साठी विरोधी पक्षांच्या दबावामुळे त्यास अटक झाली.केंद्र सरकार अनेक वेगळा विचार करत आहे.त्यांच्या भाजपच्या प्रवक्त्या चिञा वाघ यांनी कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र असा प्रश्न विचारलाय. मी त्यांना व केंद्र सरकारला विचारतो की कुठे नेवून ठेवलाय हिंदूस्थान आपला ? ? आदरणीय राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरदचद्रजी पवार, काँग्रेस चे राहुलजी गांधी व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या विचाराने महाविकासआघाडीचे सरकार सुरळीत कारभार करीत आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!