ताज्या घडामोडी

औंढोलीत सातबारा उतारे घरपोच वाटप

लोणावळा : औंढोली गावात स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शेतकऱ्यांना सातबारा उतारे मळवली सजाचे गावकामगार तलाठी  मीरा बो-हाडे यांचे हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी तलाठी कार्यालयाचे लिपिक श्रीकांत घाडगे व कोतवाल सुभाष साठे आदी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थ आणि अनेक शेतकरी उपस्थित होते.

सातबारा उतारा यावर स्वातंञ्याचे अमृतमहोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! असा प्रत्येक ७/१२ उतारा यावर मजकूर प्रींट केलेला असल्याने महाविकासआघाडीचा हा घरोघरी सातबारा उतारा वाटप उपक्रम श्री हनुमान मंदिरात संपन्न झाला. या उपक्रमाचे सर्व शेतकऱ्यांनी स्वागत केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!