ताज्या घडामोडी

सिंहगड एक्सप्रेस सोमवारपासून पुन्हा धावणार

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या जवळपास दीड वर्षापासून बंद करण्यात आलेली सिंहगड एक्सप्रेस सोमवारपासून मुंबई-पुणे मार्गावर पुन्हा  धावणार आहे.

18 ऑक्टोबर पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून संध्याकाळी 5:50 मिनिटांनी गाडी सुटणार असून दादर, ठाणे, कल्याण, कर्जत, लोणावळा,चिंचवड, पिंपरी, खडकी, शिवाजीनगर, पुणे या ठिकाणी गाडीला थांबे देण्यात आले आहेत. पुण्याहून ही गाडी सकाळी 6:05 मिनिटांनी सुटणार आहे.

रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे पिंपरी-चिंचवड प्रवासी संघाने स्वागत केले आहे. या निर्णयामुळे मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणा-या चाकरमान्या प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

मासिक रेल्वे पास सुरू करण्यासंदर्भात सहानुभूतीने विचार करून प्राधान्याने निर्णय घ्यावा अशी विनंती पिंपरी-चिंचवड रेल्वे प्रवासी संघाने रेल्वे प्रशासनाला केली आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!