ताज्या घडामोडी
अनाधिकृत नळजोड पंधरा दिवसात अधिकृत न केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार – मुख्याधिकारी सतीश दिघे
तळेगाव : शहरातील जवळपास पाच हजार अनधिकृत नळजोड धारकांनी दंडात्मक रक्कम भरून येत्या 15 दिवसात तो अधिकृत न केल्यास मालमत्ताधारकांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिली.
अनधिकृत नळजोड धारकांना तो अधिकृत करण्याची एक शेवटची संधी नगरपरिषदेच्या वतीने दिली जाणार आहे. येत्या पंधरा दिवसात धारकांनी नगर परिषदेत येऊन दंड, डिपॉझिट व पाणीपट्टी भरून त्यांचे अनधिकृत नळजोड नियमित करून घ्यावेत अन्यथा त्यांचा नळजोड विखंडित करण्यात येईल व त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे मुख्याधिकारी दिघे यांनी सांगितले.