ताज्या घडामोडी

डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई पुण्यतिथी निमित्त जनरल हॉस्पिटलमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन

तळेगाव : येथील जनरल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई यांच्या पुण्यतिथी निमित्ताने काल (13 ऑक्टोबर ) रोजी नेत्रतपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन नर्सिगस्कूलचे पालकमंत्री डॉ. शाळीग्राम भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले.

उच्च विद्याविभूषित डॉ. भाऊसाहेब सरदेसाई यांनी इंग्लंडमध्ये नेत्र चिकित्सक ही अत्युच्च पदवी संपादन करून तळेगाव स्टेशन येथील चाळीस एकर माळरानावर सुरुवातीला फक्त 5 खाटांच नेत्र रुग्णालय सुरू केलं. आज तिथे 500 खाटांच हॉस्पिटल तयार झालेल आहे. त्यात मेडिकल कॉलेज ,नर्सिंग कॉलेज, नेत्रचिकित्सा विभाग, कॅन्सर निदान आणि अत्याधुनिक उपचार हे सर्व विभाग चाळीस एकर जागेत अत्यंत यशस्वीपणे क्रियाशील आहेत.

14 ऑक्टोबर 2021 म्हणजेच डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाईंच्या पुण्यस्मरणचा दिवस आहे. या निमित्ताने  संस्थेने 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी विनामूल्य नेत्रतपासणी आणि उपचार शिबिर आयोजित केले आहे.

यावेळी उद्घाटनपर भाषणात डॉक्टर शाळीग्राम भंडारी म्हणाले की “रुग्णसेवा हीच ईश सेवा” याभावनेने गेली 96 वर्ष तळेगाव जनरल हॉस्पिटल रुग्ण सेवेत कार्यरत आहे. अत्यल्पदरात रुग्णसेवा करण्याची संधी तळेगाव जनरल हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्हाला सतत मिळते हे आम्ही आमच भाग्यच समजतो.

या शिबिरात मोफत नेत्र तपासणी करण्यात आली.तसेच यापुढे  रुग्णांची  माफक  दरात केवळ 8 हजार रुपयात मोतीबिंदू शस्रक्रिया हॉस्पिटलमध्ये केली जाणार आहे. अशी हमी संस्थेने सर्व उपस्थित रुग्णांना दिली. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या नेत्र रुग्णांना फार मोठा दिलासा मिळाला आहे.

या कार्यक्रमात नर्सिगस्कूलच्या विद्यार्थिनींनी पुरुषोत्तम योग असलेल्या भगवत गीतेतील पंधराव्या अध्यायाचे पठण केले. त्यानंतर उपस्थितांनी डॉ. भाऊसाहेब सरदेसाईच्या समाधीच दर्शन घेऊन त्यांच्याप्रती आपली श्रद्धांजली अर्पित केली.

यावेळी उद्घाटन समारंभास संस्थेचे उपाध्यक्ष  गणेश खांडगे,माजी सीईओ गुरुवर्य डॉ. अशोक निकम, हॉस्पिटलचे चेअरमन  शैलेश शहा, सेक्रेटरी डॉ. संजीव कडलास्कर, खजिनदार  विनायक अभ्यंकर, संचालक हेमंत सरदेसाई व सर्व सरदेसाई परिवार,संचालक  चंद्रभानजी खळदे,नर्सिंग स्कूलचे पालकमंत्री डॉ. शाळीग्राम भंडारी,नेत्रतज्ञ डॉ. प्रतिक चौगुले,डॉ. कल्पिता राऊत,प्राचार्य मोनालीसा मॅडम नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य मोनालिसा मॅडम आणि त्यांचा सर्व शिक्षक वर्ग ,विद्यार्थिनी आणि हॉस्पिटलचा सर्व कर्मचारी वर्ग हे या कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमा यशस्वी करण्यास  व्यवस्थापक डॉ. अजय ढाकेफळकर व नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आणि कर्मचारी वर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!