ताज्या घडामोडी

पैसाफंड ते वडगाव रस्ता दुरुस्त करण्यासाठी निधी द्या – सायली म्हाळसकर

पैसाफंड ते वडगाव या मार्गावर होतेय नागरिकांची मोठी गैरसोय

वडगाव मावळ : तळेगाव येथील पैसाफंड कारखाना ते वडगाव मावळ या साखळी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी व डांबरीकरणासाठी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रहाची मागणी नगरसेविका सायली म्हाळसकर यांनी मावळचे  आमदार सुनील शेळके यांच्याकडे केली आहे.

सध्या तळेगावातील पैसा फंड काच कारखाना ते वडगाव मावळ या भागातील रस्त्यावर वर्दळ वाढली आहे. विद्यार्थी कामगार आणि शेतकरी व मावळ पंचक्रोशीतील रहिवासी हा मार्ग सुरक्षित आणि सोयीस्कर असल्यामुळे दळणवळणासाठी या मार्गाचा वापर करत आहे. पण हा रस्ता सध्या अत्यंत अरुंद असून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.त्यामुळे  नागरिकांची  प्रचंड गैरसोय होत आहे.

त्यातच नियोजनाने होणारा रिंग रोड आणि झपाट्याने होणारे नागरीकरण जर विचारात घेतले तर येत्या काळामध्ये या रस्त्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. याच बाबतीत दूरदृष्टी ठेवून या रस्त्याचे डांबरीकरण आणि योग्य प्रकारे रुंदीकरण करून दिलासा देण्याची गरज आहे. याच कामांमध्ये रस्त्याच्या बाजूस असणाऱ्या वीज वाहक तारा या भूमिगत करणे गरजेचे आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध मोठ्या आकाराची सांडपाण्याची व्यवस्था करणे जरुरीचे आहे. आणि रस्त्याच्या एका बाजूने पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी टाकणी ही महत्त्वाचे आहे .

प्रस्तावित डीपी आराखड्यानुसार 18 मीटर असणारा रस्ता कमीत कमी 12 मीटर करणे जरुरीचे आहे आणि रस्त्याच्या एका बाजूस फुटपाथ आणि दुसऱ्या बाजूस झाडे लावून सुशोभिकरण करणे यासाठीच निधी देण्याची मागणी नगरसेविका म्हाळसकर यांनी केली आहे. आमदार सुनील शेळके यांनी या गोष्टीला सकारात्मक प्रतिसाद देऊन या रस्त्याच्या कामास जास्तीत जास्त निधी देण्याचे आश्‍वासन दिले आहे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!