ताज्या घडामोडी

खुशखबर!आता अठरा वर्षाच्या खालील मुलांना रेल्वे प्रवासाची मुभा

मुंबई : दसर्‍याच्या शुभमुहुर्तावर लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर राज्य सरकारने दिली आहे. 18 वर्षाच्या खालील मुलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोकलसेवा बंद होती.त्यानंतर लोकलसेवा सुरू करण्यात आली. परंतु फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्या पाठोपाठ लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली.

परंतु यापुढे 18 वर्षाखालील मुलांनाही लोकल प्रवास करता येणार आहे. शासनाच्या नव्या धोरणामुळे लोकल प्रवासाकरिता आता स्टेशन वरील तिकीट खिडकीतून सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत तिकिटांची विक्री केली जाणार आहे.तिकिटांची विक्री फक्त तिकीट खिडकीतून होईल. जेटीबीएस,एटीव्हीएम कुपन्स, आणी युटीएस ॲपवर तिकीट उपलब्ध होणार नाही.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!