विजयादशमी दिवशी खंडाळातील अपघातात मोहीत पायगुडे व कामगार जागीच ठार
लोणावळा : विजयादशमी दिवशी खंडाळातील कार व मोटारसायकल अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. लोणावळा शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारी पावणे चारचे सुमारास हा अपघात झाला. मोहीत सुनिल पायगुडे (वय-३९,रा-खोंडगेवाडी , लोणावळा )आणि गौतम बेहरा (वय-३५,रा-लोणावळा ) असे मरण पावलेल्या दोघांची नावे आहेत.
कारचालक विवेक परमेश्वरन नायर ( वय-४१, रा -सी.बी.डी.बेलापूर,नवी मुंबई ) असे गुन्हा दाखल केलेल्या कारचालकाचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी कारचालक विवेक नायर हा मुंबईला कार क्रमांक एम.एच.१४,डी.एन-३६३८ हीने मोटारसायकल क्रमांक एम एच १४,सी टी २९१९ हीस जोराने दिल्याने आपघात घडला.यात पायगुडे व बेहरा यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. पोलिस निरिक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार घोटकर तपास करीत आहे.
खोंडगेवाडीवर शोककळा :
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे यांचे कै.मोहीत पायगुडे जवळचे नातेवाईक होते. कै. पायगुडे यांचे पश्चात आई , वडील, पत्नी , दोन मुली,भाऊ असा परिवार आहे. त्यांचे पार्थिवावर काल कैलासनगर स्मशानभूमित दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.