ताज्या घडामोडी

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे पिंपरी-चिंचवड मध्ये जोरदार स्वागत

चिंचवड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार दोन दिवसीय पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आले आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ते शहरात आले आहेत. यावेळी शहरातील कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व नगरसेवकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

महापालिका निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवक युद्धपातळीवर तयारीला लागले आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः शहरात लक्ष केंद्रित केल्यामुळे कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या ताकदीने उतरणार असे चित्र आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!