ताज्या घडामोडी

ठरलं तर ! उपजिल्हा रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन

लोणावळा : शहरातील नागरिकांसाठी गरजेचे व बहुप्रतीक्षीत उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन (20ऑक्टोबर) बुधवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

लोणावळा नगर परिषदेचे श्रीमान बाबासाहेब डहाणूकर रुग्णालय अनेक वर्षापासून बंद पडले होते. त्या ठिकाणी थोड्या अवधीसाठी बाह्यरूग्न सेवा सुरू होती. मात्र इतर सोयी सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे सर्वसामान्य गरीब नागरिकांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दुप्पट पैसे मोजावे लागत होते.

शहरात सर्व सोयीसुविधांनी सज्ज असा दवाखाना व्हावा अशी लोणावळेकरांची मागणी होती.ही बाब लक्षात घेऊन अखेर नगरपरिषदेने ठराव करत दवाखाना शासनाकडे वर्ग केला. या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय होणार असून त्याचा भूमिपूजन समारंभ अवघ्या दोन दिवसांनी होईल.

मावळचे आमदार सुनील शेळके यांनी निवडणूक काळात लोणावळ्यात उपजिल्हा रुग्णालय उभारले जाईल असा शब्द दिला होता. त्यानुसार या रुग्णालयाच्या कामासाठी 41 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच भूमिपूजन समारंभ पार पडेल.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!