ताज्या घडामोडी
लोणावळा पोलिसांच्या वतीने बेवारस,अपघातग्रस्त वाहनांचा होणार लिलाव
लोणावळा : लोणावळा पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेवारस,अपघातग्रस्त वाहने ब-याच कालावधीपासून पडून आहेत.या वाहनांबाबत वारंवार आवाहन करुनही मालकी हक्क सांगण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याने या वाहनांचा लोणावळा पोलिसांच्या वतीने लिलाव करण्यात येणार आहे.
या संदर्भात वृत्तपत्रात नोटीस प्रसिद्ध करण्यात आली असून वाहनांशी संबंधित असणा-या व्यक्तींनी 19 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या नोटीसीनुसार 30 दिवसांच्या आत कागदपत्रासह हजर रहावे.अन्यथा वाहनांचा लिलाव होईल.नंतर कोणतीही सबब ग्राह्य धरली जाणार नाही अशी माहिती लोणावळ्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.