ताज्या घडामोडी

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त वह्यांचे वाटप

तळेगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त राष्ट्रवादीच्या सातारा जिल्हा निरीक्षक व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीस आणी तळेगाव दाभाडे नगरपरिषद नगरसेविका वैशाली दाभाडे यांनी वह्यांचे वाटप केले.

मंगळवार (19 ऑक्टोबर ) रोजी नगरपालिकेच्या शाळा क्रमांक एक, शाळा क्रमांक दोन व शाळा क्रमांक पाच मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले

एका वर्षात १२ पौर्णिमा ८१ वर्ष + दर ३ वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यातील २७ पौर्णिमा= ९९९ पौर्णिमा + १९ ऑक्टोबर रोजीची कोजागिरी पौर्णिमा उर्फ शरद पौर्णिमा = १००० पौर्णिमा ‘आदरणीय साहेबांच्या जीवनातील प्रवास हा राष्ट्रवादी परिवारातील सर्वच सदस्यांना आनंद देणारा आहे. सर्व समाजाला, महाराष्ट्राला, भारत देशाला प्रगतीपथावर नेणारा आहे.’

19 ऑक्टोबर रोजी पौर्णिमेनिमित्त नगरपालिकेच्या शाळा क्र 1,2,5 शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाह्या वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेविका मंगल  भेगडे,युवती अध्यक्ष निशा पवार ,मुख्याध्यापिका सुरेखा जाधव ,मुख्याध्यापक प्रकाश जाधव,शोभा कांबळे ,घाटे , रेखा विधाते ,चेतना आसर,वैशाली साबळे,पाकीजा मुलानी,राजेंद्र शिंदे सर,धीरज भालेराव  उपस्थित होते.

 

 

 

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!