ताज्या घडामोडी

सिक्स पॅक साठी बेकायदा औषधांची विक्री करणा-यांना पुणे पोलिसांनी केले जेरबंद

पुणे पोलिसांची धडक कारवाई

पुणे : शरीरयष्टी वाढविण्याकरिता डॉक्टरांचे – प्रिस्क्रीप्शन द्वारेच विक्री करणे बंधनकारक असलेले मेफेनटेरमाईन सल्फेट इंजेक्शन अवैधरित्या जवळ बाळगून त्याची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या चार आरोपींना बिबवेवाडी पोलीसांनी अटक केली आहे . त्यांच्या ताब्यातून पोलीसांनी 211 इजेक्शन औषधाचे बॉटल्स, एक स्विफ्ट कार असा एकूण दोन लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे अशी माहिती परिमंडळ पाचच्या पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे.

या प्रकरणी परेश निवृत्ती रेणुसे ( वय -33, रा . धनकवडी , पुणे ), प्रविणसिंग पुकसिंग भाटी ( 23, रा.शिवणे, पुणे ) , अक्षय संभाजी वांजळे ( 26, रा . वारजे , पुणे ) व शौनक प्रकाश संकपाळ ( 28, रा . बहिरटवाडी, पुणे ) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी परिसरात एकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शरीरसौष्ठव व शरीरयष्टी वृद्धीसाठी मेफेनटेरमाईन सल्फेट इंजेक्शनची
(mephentermine sulphate injection) बेकायदा विक्री करत असल्याची माहिती बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे आणि पीएसआय संजय आदलिंग यांना पेट्रोलिंग करत असताना मिळाली की, एक इसम डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन शिवाय शरीरयष्टी वाढविण्याकरिता इंजेक्शनची विक्री करण्यासाठी बिबवेवाडी येथील डॉल्फीन चौकात येणार आहे. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल झावरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने आरोपी परेश रेणुसे यास सापळा रचून अटक केली.

त्याच्याकडून इंजेक्शनच्या 6 बाटल्या हस्तगत करण्यात आल्या रेणुसेकडे सखोल चौकशी केली असता 211 बॉटल्स व एक कार मिळून आली, तसेच त्याने हे औषध शौनक संकपाळ याने विक्री करण्यासाठी दिले असल्याचे सांगितले.

दरम्यान, या घटनेची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक अतिश सरकाळे  यांना देण्यात आली.सरकाळे यांनी पोलिसांनी जप्त केल्या औषधांची तपासणी केली. त्यावेळी रेणुसे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बेकायदा औषधाची विक्री करत असल्याचे समोर आले.तपास मिळालेल्या माहितीनंतर आरोपी भाटी, वांजळे, संकपाळ यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 211 बाटल्या आणि एक कार जप्त करण्यात आली, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

ही कारवाई पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे  यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे , पोलीस निरीक्षक गुन्हे अनिता हिवरकर , सहाय्यक निरीक्षक प्रवीण काळुखे, उपनिरीक्षक संजय आदलिंग , सचिन फुंदे, संतोष जाधव, नितीन धोत्रे तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागातील निरीक्षक अतिश सरकाळे यांनी केली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!