कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने दहिवली गावात वृक्षारोपण
लोणावळा : कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून दहीवली येथील युवकांच्या पुढाकाराने व दहीवली ग्रांमस्थांच्या सहकार्याने दहीवली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सुंदुबरे ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप राक्षे,वेहेरगाव दहीवली ग्रुप ग्रामपंचायतीचा उपसरपंच काजल पडवळ,पाटण बोरज ग्रामपंचायतीचे सदस्य विजय तिकोणे,वनधिकारी प्रमोद रासकर,उधोजक संदीप देवकर,यांचा हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन भाऊसाहेब मावकर,मावळ तालुका राष्ट्रवादीचे नेते तान्हाजी पडवळ,शांताराम मावकर,विष्णू मावकर,माजी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग मावकर,सागर येवले,प्रसिद्ध गाडामालक नवनाथ पडवळ,ग्रामपंचायत सदस्य सुनिल येवले,किरण येवले,शिवाजी कुटे,लक्ष्मण धुमाळ,मारूती भानुसघरे,गोपाळ मावकर,जितु मावकर,दिपक राम मावकर,संतोष मावकर,सिध्देश मावकर,शरद मावकर,प्रतीक मावकर,हर्षद मावकर,ह्रषीकेश गायकवाड,ओम मावकर इत्यादी उपस्थित होते.