ताज्या घडामोडी

पीएमपीएलचे उत्पन्न कोटींच्या घरात

पिंपरी : येथील पीएमएलचे उत्पन्न सध्या एक कोटींपेक्षा अधिक झाले आहे. ऑक्टोबर महिन्यात उत्पन्न दररोज 30 ते 40 लाखांपर्यंत होते. त्यात यंदा चांगलीच वाढ झाली असून ते कोटींच्या घरात गेले आहे.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पीएमपीएमएलच्या बसेस केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावत होत्या. त्यामुळे उत्पन्नात चांगलीच घट होऊन ते एक लाखांच्या आत आले होते. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये केवळ 400 बस शहरातील रस्त्यांवर धावत होत्या.

तर ऑक्टोबर महिन्यात यात भर पडून 700 ते 800 बस मार्गावर धावू लागल्या. त्यावेळी उत्पन्न वाढून 30 ते 40 लाखांपर्यंत पोहोचले. परंतु सध्या पीएमपीएलच्या 1450 ते 1460 बसेस मार्गावर धावत असून उत्पन्न कोटींवर गेले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!