ताज्या घडामोडी

नेहरूनगर भागातील नाला गायब; आयुक्तांनी खुलासा करावा नागरिकांची मागणी

चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील नेहरूनगर भागात असणाऱा नैसर्गिक सांडपाणी वाहून नेणारा नाला गायब झाला आहे. याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल करण्याच्या पवित्र्यात पिंपरी-चिंचवडकर आहेत. याबाबत आयुक्त राजेश पाटील यांनी खुलासा करावा अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

नेहरूनगर हा भाग रहिवासी क्षेत्र असल्याने नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला असून असे आणखी किती नाले गायब झाले आहेत त्याचे ऑडिट करावे अशी नागरिकांची मागणी आहे. याविषयी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार नागरिक नोंदवणार आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!