ताज्या घडामोडी

पिंपरी-चिंचवड शहरावर लागलेले दिवसाआड पाणी पुरवठ्याचे धोरण हटवा – नगरसेवक सचिन चिखले

चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचे धोरण हटवण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सचिन चिखले यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपरी चिंचवडचे तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तांत्रिक कारणे देत गत 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला.त्यावेळी शहरवासीयांना केवळ सहा महिने हा त्रास असेल त्यानंतर नियमित पाणीपुरवठा होईल असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. आज जवळपास दोन वर्षाहून दिवसाआड पाणीपुरवठा ची टांगती तलवार शहरवासीयांच्या मानगुटीवर बसलेली आहे असे निवेदनात म्हटले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 100 टक्के भरलेले असताना प्रशासनाच्या अडेलतट्टू भूमिकेमुळे नागरिकांना पाण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सणासुदीच्या काळात देखील या धोरणात पालिकेकडून शिथिलता दिली जात नाही अशी तक्रार निवेदनात करण्यात आली आहे.

1 नोव्हेंबर पासून शहरात सर्वत्र टप्प्याटप्प्याने नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी आपण आयुक्त या नात्याने पुढाकार घ्यावा. नागरिकांना नियमित पाणी देऊन दिलासा द्यावा. अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने पाणी देणार भाग पडेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी शहर सचिव रूपेश पटेकर, महिला अध्यक्ष अश्विनी बांगर, शहरसचिव संगीता देशमुख, उपशहर अध्यक्ष अनिता पांचाळ, विद्यार्थी सेना शहर संघटक श्रद्धा देशमुख आदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!