आमदार अण्णा बनसोडे यांच्या वतीने कलाकारांना दिवाळी फराळ व अन्नधान्य वाटप
चिंचवड : पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या वतीने काल (31 ऑक्टोबर) रोजी चिंचवड कलाकार संघाच्या 300 सभासदांना दिवाळी शुभेच्छा देऊन फराळ व अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात ऑर्केस्ट्रा, लोकसंगीत, लोककला या कलाक्षेत्रात बर्याच वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या व मोलाचे योगदान देणाऱ्या कलावंतांचा सत्कार सन्मान करण्यात आला.
यावेळी मोहम्मद रफी, शेख इक्बाल, दरबार,माणिक बजाज, सुबोध चांदवडकर, शंकर जाधव, शशिकांत कोठवळे, रूही संगमनेरकर, अलका जगताप, शितल चोपडे ,संगीता लाखे, अर्चना जावळेकर, शिवांगी शर्मा, उषा करंबळेकर, वर्षा जगताप, जूनियर अमिताभ बच्चन , रजनीकांत, जॉनी लिव्हर, देवानंद तसेच अवसरी दादा या सर्व कलाकारांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात कलाकारांनी आपली कला सादर केली. सचिन काटे ग्रुपने गोंधळ, महेंद्र भांबेड ग्रुपने नृत्य व बहारदार लावणी, शिल्पा भवार, स्वाती यांनी गीते सादर केले.