ताज्या घडामोडी

कुणे गावातील कातकरी वस्तीमध्ये पणत्या व फराळाचे वाटप

लोणावळा : हिंदू समिती लोणावळा व ग्रामीण परिसर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व कुणे गावातील ग्रामस्थांच्यावतीने कुणे गावातील कातकरी वस्ती मध्ये प्रत्येक घरात आकाश कंदील, पणत्या व फराळ वाटप करण्यात आले.

काल सोमवार (1 नोव्हेंबर) रोजी कातकरी वस्ती मधील प्रत्येक घरात फराळ व इतर वस्तूंचे वाटप करण्यात आले.शहरी नागरिकांप्रमाणे वाड्या-वस्त्या वरील आदिवासी समाजालाही कोरोना महामारीचा फटका बसला आहे. आर्थिकदृष्ट्या दुबळ्या असणा-या या समाजात दिवाळी सणाच्या निमित्ताने येथील आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावरचे आनंद  फुलवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संजय ढाकोळ, रामदास शेलार, रामदास पांडव , बाळकृष्ण बलकवडे , अशोक कुटे, ब्रिंदा गणात्रा, सदाशिव सोनार, लक्ष्मण केदारी, हरीश्चंद्र गुंड , संदिप गायकवाड, अर्जुन शिंदे, शैलेश भोसले, केतन खांडेभरड, चंद्रकांत गाडे , सुनिल गायकवाड,उपस्थित होते.कातकरी समाजातील नेते अनिल भाऊ वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!