लोणावळा – 26 ऑक्टोबर रोजी आवाज न्युजने मळवली – सदापुर या रस्त्या संदर्भात सदापुर वासीयांचा रस्त्याचा वनवास संपता संपेना या मथळ्या खाली बातमी प्रसारित केली होती. याबाबत आवाज न्यूजने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून या बातमीची दखल घेवून या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
जागरुक नागरीकांनीही याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्याच बरोबर या रस्त्याच्या संबधित यंत्रणेनेही याची दखल घेऊन या रस्त्यावर मुरूम टाकुन खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या बद्दल नागरीकांनी समाधान व्यक्त केले. परंतु भविष्यात हा संपुर्ण रस्ता शंभर टक्के दुरूस्त झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.