ताज्या घडामोडी

चुरशीच्या लढतीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर भरघोस मतांनी विजयी

 

गुजरात : दादरा नगर हवेली लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या भरघोस मतांनी विजयी झाल्या आहेत.

खासदार मोहन डेलकर यांच्या निधनानंतर दादरा नगर हवेलीची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती.

 

या निवडणुकीमध्ये विरोधी भाजप उमेदवार महेश गावित यांना 63 हजार 352 मते मिळाली असून कलाबेन डेलकर यांना 1 लाख 17 हजार 590 मते मिळाली.कलाबेन यांनी भाजपचे उमेदवार गावित यांचा 55 हजाराच्या मताधिक्क्याने दणदणीत पराभव केला.

या विजयामुळे पहिल्यांदाच महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचे हे पहिलेच सीमोल्लंघन आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!