ताज्या घडामोडी
सरपंच, उपसरपंचाला धक्का! निवडणूक खर्च वेळेत सादर न केल्याने गमावले पद
कुरकुंभ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच यांनी निवडणूक खर्च वेळेत व विहित नमुन्यात सादर न केल्याने विभागीय आयुक्तांनी दोघांनाही अपात्र ठरविले आहे.
सरपंच राहुल भोसले व उपसरपंच विनोद शितोळे यांनी आपले पद गमावले आहे. त्यांनी 2018 ते 2023 या पंचवार्षिक निवडणुकीचा खर्च वेळेत व विहित नमुन्यात सादर केला नसल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
तसेच त्यांनी सादर केलेली बिले, खर्चासाठी बँकेत उघडण्यात आलेल्या खात्यातून खर्च केला नाही. प्रतिज्ञापत्र बिलांवर तारखा व सह्या नसणे अशा बाबी आढळून आल्या आहेत.