ताज्या घडामोडी

जायंट्स ग्रुप ऑफ तळेगावमुळे आदिवासी बांधवांची दिवाळी झाली गोड

जायंट्स ग्रुप ऑफ तळेगाव दाभाडे जायंट्स ग्रुप ऑफ मावळ सखी व यंग जायंट्स ऑफ तळेगाव या सामाजिक संस्थेचा स्तुत्य उपक्रम

 

शिवणे : मावळातील अहिरवडे व चिखलसे या गावातील आदिवासी बांधवांच्या कुटूंबियांना जायंट्स ग्रुप आॅफ तळेगाव जायंट्स ग्रुप आॅफ मावळ सखी व यंग जायंट्स आॅफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने दिवाळी सणानिमित्त ” एक हात मदतीचा ” या संकल्पनेतून फराळ व इतर भेटवस्तूचे वाटप करण्यात आले.

फराळ वाटपामध्ये ग्रुप मधील सभासदांच्या घरी त्यांनी स्वतः बनविलेले फराळाचे पदार्थ, सुगंधी उटणे, तेल,साबण इत्यादींचा समावेश होता याप्रसंगी आदिवासी बांधवांना ग्रुपच्या माध्यमातून एक सामाजिक जाणीवेचा संदेश देत फराळाचे वाटप करण्यात आले.

या आनंददायी कार्यक्रमासाठी जायंट्स ग्रुप आॅफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष मन्वेश लिमये,युनिट डायरेक्टर एडवोकेट देविदास टिळे, संस्थापक अध्यक्ष संदिप गोंदेगावे,जायंट्स मावळ सखी ग्रुपच्या अध्यक्षा प्रियांका साखरे,सखी माजी अध्यक्षा वंदना कोळी, जायंट्स ग्रुप आॅफ तळेगावचे खजिनदार युवराज बडगुजर, सुनिल साखरे,सुनिल नकताळे हे उपस्थित होते.

यावेळी अहिरवडे,चिखलसे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच रिना बालघरे ग्रामपंचायत सदस्य सविता काजळे तसेच ग्रामस्थ सोमनाथ काजळे, नंदकुमार काजळे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!