ताज्या घडामोडी

पुणे महानगर नियोजन समिती निवडणूकीसाठी राष्ट्रवादीचा मार्गदर्शन मेळावा कान्हे येथे संपन्न

कान्हे : राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे महानगर नियोजन समिती निवडणूक मार्गदर्शन मेळावा कान्हे येथे संपन्न झाला.

या निवडणुकीसाठी मतदान बुधवार दि.10 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यावेळी उमेदवार संतोष भेगडे, वसंत भसे,प्रियंका पाठारे, दिपाली हुलावळे उपस्थित होते.

मतदारांना निवडणूक प्रक्रिया समजावुन सांगत आपल्या उमेदवारांना पसंती क्रमांक 1 द्यावा. ग्रामीण क्षेत्रात मोठ्या संख्येने उमेदवार असल्याने निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे सर्वांनी एकदिलाने अधिकृत उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी यावेळी  केले.

यावेळी माजी मंत्री मदनजी बाफना, जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, उपाध्यक्ष संत तुकाराम कारखाना बापूसाहेब भेगडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य  विठ्ठलराव शिंदे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, नगरसेवक गणेश खांडगे, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, नामदेवराव दाभाडे, जिल्हा परिषद सदस्या कुसुम काशीकर, पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत, युवक अध्यक्ष सुनिल दाभाडे, महिला तालुकाध्यक्षा सुवर्णा राऊत, नगरसेविका वैशाली दाभाडे, संजय गांधी समिती अध्यक्ष  नारायण ठाकर, तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी,नगरसेवक, सरपंच,मतदार बंधु-भगिनी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!