ताज्या घडामोडी
राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता
पुणे : राज्यातील काही भागात विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
25 ऑक्टोबर पासून मान्सूनने देशातून परतीचा प्रवास सुरू केला. परंतु श्रीलंका आणि तामिळनाडू किनाऱ्यालगतच्या समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने 4 ते 10 नोव्हेंबर या कालावधीत राज्यातील काही भागात पाऊस पडेल असा अंदाज आहे.