ताज्या घडामोडी

खुशखबर ! डिझेल, पेट्रोलच्या पाठोपाठ खाद्यतेलही होणार स्वस्त

दिल्ली : केंद्र सरकारने क्रूड, पामतेल, कच्चे सोयाबीन आणि कच्चे सूर्यफूल तेल यावरील बेसिक ड्युटी 2.5 टक्क्यांवरून शून्यावर आणली आहे. त्यामुळे डिझेल,पेट्रोल पाठोपाठ खाद्य तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे .केंद्र सरकारच्या ग्राहक, व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने ही माहिती दिली.

कच्च्या पामतेलासाठी एग्रीकल्चर सेस 20 टक्‍क्‍यांवरून 7.5 टक्के सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलासाठी 5 टक्के करण्यात आला आहे.

देशभरातील प्रमुख रिटेल बाजारात खाद्य तेलाच्या किमती 5 ते 20 रुपयांनी कमी झाल्या आहेत.सरकारच्या उपाययोजनांमुळे खाद्य तेलाच्या किमती खाली आल्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!