मान्यवरांच्या हस्ते ‘पंढरी’ सिनेमाचे पोस्टर रिलीज
पुणे : पाटील प्रोडक्शनच्या उद्घाटनानिमित्त ‘द व्हायरल सिनेमा’ प्रोडक्शन निर्मित व दिग्दर्शक प्रशांत सुर्वे दिग्दर्शित ‘पंढरी’ या सिनेमाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भटक्या जमातीमधील माणसाच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे. या चित्रपटाची संकल्पना प्रवीणकुमार सुतार यांची आहे. आनंदराव साकोरे यांनी चित्रपटाचे आर्ट डिरेक्शन केले आहे.तर सचिन अरोरा हे कॅमेरामन आहेत.आयुष कांबळे मेकअप आर्टिस्ट असून प्रॉडक्शन मॅनेजर जाकीर शेख हे आहेत.
संदीप साकोरे, प्रकाश वाघमारे, पद्मा पारठे, पल्लवी भोईटे, दुर्वा ढमढेरे, ॠषिता मोरे, अमर कांबळे, अतुल व पाटलाच्या भूमिकेत सुरेश धोत्रे या कलाकारांनी चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या आहेत.
भव्य पाच मजली स्टुडिओचे उद्घाटन
यावेळी मुक्ता लॉन्स येथील तळजाई मंदिराशेजारील धनकवडी भागात उभारलेल्या पाच मजली भव्य स्टुडिओचे उद्घाटन दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर 5 नोव्हेंबर रोजी करण्यात आले.
या स्टुडिओत चित्रपटासाठी आवश्यक असणाऱ्या रेकॉर्डिंग, साऊंड सिस्टिम एडिटिंग, डबिंग, मिक्सिंग या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत.
या उद्घाटन प्रसंगी हिरामन धनकवडे(पाटील प्रोडक्शन), सुरेश धोत्रे (अखिल भारतीय नाट्य परिषद अध्यक्ष तळेगाव शाखा) रोहन शेट्टी (भाजप चित्रपट कामगार आघाडी अध्यक्ष पुणे शहर) दिग्दर्शक प्रशांत सुर्वे, अभिनेत्री पूजा पुरंदरे व पाटील प्रॉडक्शनचे सर्व सभासद उपस्थित होते.