ताज्या घडामोडी

एस. टी.कर्मचा-यांचा संप लांबल्याने वलवण येथील बसस्थानकामध्ये लालपरी नाही ; प्रवाश्यांची कोंडी

लोणावळा : एस टी कर्मचारी यांचा संप लांबल्याने लोणावळ्याच्या वलवण येथील बसस्थानकामधून बसचा शुकशुकाट दिसून आला. फक्त एकच प्रवासी लालडबा या बसस्थानकात आलेला होता. ती बस गेल्यावर बसस्थानकात प्रवाशांची कोंडी होत असल्याचे वलवण येथील बसस्थानकात पहायला मिळाले.

निगडीवरून येणाऱ्या पीएमपी बसला माञ प्रवाशांची गर्दी दिसून आली. राज्यसरकारमधे एस टी कर्मचारी यांना सामावून घ्यावे व त्यांचेप्रमाणे पगार व भत्ते मिळावेत , आशी मागणी लावून धरत एस टी कर्मचारी संघटना मागण्यासाठी ठाम राहिल्याने संप चिघळला आहे.

या पार्श्वभूमीवर लोणावळ्याच्या वलवण बसस्थानकात संपाचा आढावा घेतला आसता ;आनेकांना भाऊबीज झाल्यावर घरी परत जाण्याचे वेध लागले आहेत. संपामुळे घरी जाणाऱ्या भाऊराया , बहिणी तसेच चाकरमानी यांचे हाल होत आहेत. खाजगी वाहनांचे दर वाढल्यामुळे खिशाला नाहक भुर्दड बसत आसल्याचे प्रवाशांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!