ताज्या घडामोडी

राष्ट्रपिता महात्मा गांधी , भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर , संत गाडगेमहाराज आणि लोकमान्य टिळक या राष्ट्रपुरूषांचे पुतळे उद्घाटनासाठी तयार

लोणावळा : राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर , संत गाडगेमहाराज आणि लोकमान्य टिळक या राष्टपुरूषांचे चार पुतळे उद्घाटनासाठी नव्वद टक्के तयार आसून ६ डिसेंबर पूर्वी उद्घाटनासाठी प्रतिक्षा आहे .

लोणावळा नगरपरिषदेच्या आवारात बसविलेल्या राष्ट्रपुरूषांचे पुतळ्यासमोर सुशोभिकरणाबाबत आर पी आयचे जिल्हाध्यक्ष व लोणावळ्याचे माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी आज पाहणी केली. त्यांनी यावेळी ठेकेदार व त्यांचे कारागीर यांना कामाबाबत सूचना दिल्या.

लोणावळा नगरपरिषदेच्या आवारातील या देखण्या पुतळ्यांचे कामात अनेक वर्षे लोटली आहेत. माजी राज्यमंञी बाळा भेगडे यांनी या कामासाठी भरीव निधी दिल्याने हे काम कोटीच्या वर खर्चाचे झाले आहे. या कामात बरेच वर्षे दिरंगाई झाली आहे. अनेक १४ एप्रिल चे डाॕ.आंबेडकर यांचे जन्मदिनाचे कार्यक्रम या भागात पुतळा नसताना प्रतिमा सुशोभित करून तसेच नगरपरिषदेच्या इमारतीवर विद्युत रोषणाई करून करण्यात आले. आता पुतळ्यांचे उद्घाटनासाठी नागारिक व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आनुयायी यांची काही दिवसात प्रतिक्षा संपणार आहे.

या कामाबाबत उद्घाटनासाठी आणखी किती वेळ लागणार ? असे विचारले आसता ; श्री.वाघमारे यांनी सहा डिसेंबरपूर्वी काम पूर्ण होऊन उद्घाटन होणे आपेक्षित आहे , असे आवाज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले . यावेळी त्यांचेबरोबर आर.पी.आयचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!