ताज्या घडामोडी

कै. संजय हुलावळे प्रतिष्ठानच्या वतीने दिपावलीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कार्ला : कार्ला ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच कै संजय (आवानाना)हुलावळे या प्रतिष्ठानचा स्थापना दिना निमित्त दिपावलीचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्याचा बक्षीस वितरण समारंभ मान्यवरांचा उपस्थित संपन्न झाला.

कै संजय (आवानाना )हुलावळे यांनी ग्रामपंचायतीचा दहा वर्षाचा कालावधीत सर्वसामान्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जनसामान्य॔साठी केलेले काम अविरत पुढे चालु राहवे या उदेशाने त्यांच्या नावाने प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली. दिपावलीचे औचित्य साधुन आदिवासी पाड्यावर स्वच्छता करण्यात आली. तसेच संपर्क संस्था बालग्राम येथील मुलांना फराळ वाटप व धान्य वाटप करण्यात आले.

तसेच गावातील महीला भगिनी,विधार्थी,शिवप्रेमी यांचा कलागुणांना वाव मिळावा म्हणून किल्ले स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,लिंबु चमचा,वकृत्व स्पर्धेचं आयोजन प्रतिष्ठानचा वतीने आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस समारंभ प्रतिष्ठानचे विश्वस्त मंडळ व मान्यवरांचा उपस्थित संपन्न झाला.

किल्ले स्पर्धेत जाधव पाटील परीवाराने प्रथम क्रमांक तर मोरया ग्रुपने व्दितीय क्रमांक व एकविरा ग्रृपने तृतीय क्रमांक पटकावला.

भावनिक वातावरणात संपन्न झालेल्या या बक्षीस समारंभ वेळी जिल्हा परीषदेचे माजी सदस्य भाई मोरे,प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब हुलावळे,उपाध्यक्ष विशाल जमदाडे,उपसरपंच किरण हुलावळे,प्रतिष्ठानचा सचिव ग्रामपंचायत सदस्या वत्सला संजय हुलावळे,प्रतिष्ठानचे विश्वस्त ग्रामपंचायत सदस्य सचिन हुलावळे,ग्रामपंचायत सदस्या सोनाली सतिश मोरे,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कक्षाचे युवासेनेचे उपाध्यक्ष विशाल हुलावळे,मावळ विधानसभा युवासेना चिटणीस बंटी हुलावळे,महाराष्ट्र चर्मकार संघटनेचे नेते दिनेश जाधव,सामाजिक कार्येकर्ते अंकुश गायकवाड,संतोष मोरे,प्रतिष्ठानचे सल्लागार ॲड सुनिल पटेकर,विश्वस्त अजय मोरे,शैलेश चव्हाण,राजु हुलावळे,अमर गुरव,भरत हुलावळे,बाबाजी सोंडेकर,खजिनदार अक्षय हुलावळे,संजय हुलावळे(सर),अनिल पटेकर(सर),सामाजिक कार्येकर्ते मंगेश हुलावळे, गौरव जाधव,आदेश हुलावळे,सामाजिक कार्येकर्ते राजु जाधव,सचिन भिम हुलावळे, गणेश हुलावळे,अक्षय केदारी,अमोल इंगवले,सोमनाथ हुलावळे,विष्णु हुलावळे,साहिल हुलावळे,राजु मोरे,हनुमंत दळवी, इत्यादी उपस्थित होते.

कार्यक्रमाचा शेवटी कोरोनाचा दिड वर्षाचा काळात ज्या व्यक्तींचे निधन झाले अशा मृतात्म्यांना श्रध्दाजंली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!