ताज्या घडामोडी
ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्यावतीने रसिक प्रेक्षकांसाठी गाणं मैफिलीचे आयोजन
तळेगाव : येथील ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाच्या वतीने दिवाळी फराळ निमित्त आयुर्वेदाचार्य डॉ. रवी आचार्य यांच्या वाद्यवृंदाचा मराठी – हिंदी गीतांचा कार्यक्रम शुक्रवार (19 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
सौ. पुष्पाताई बवले सभागृहात होणा-या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी व गाणं रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने अध्यक्ष सुधाकर रेम्बोटकर यांनी केले आहे. या कार्यक्रमानंतर रसिक प्रेक्षकांना दिवाळी फराळाचा आस्वाद घेता येणार आहे.