ताज्या घडामोडी
पीएमआरडीए निवडणुकीत ग्रामीण तसेच लहान नागरी मतदार संघात 100 टक्के मतदान
वडगाव : पुणे महानगर नियोजन समितीच्या बुधवार (दि 10 नोव्हेंबर) रोजी पार पडलेल्या निवडणुकीत शंभर टक्के मतदान झाले आहे.
मावळ पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या मतदानात ग्रामीण मतदार संघ व लहान नागरी मतदार संघाला 100 टक्के मतदान झाले.
शुक्रवार (12 नोव्हेंबर) रोजी सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.
बुधवारी सकाळी 9 वाजता सुरू झालेले मतदान दुपारी अडीच पर्यंत संपले. ग्रामीणमध्ये 102 ग्रामपंचायतीचे मतदार तर लहान नागरी मध्ये लोणावळा व तळगाव नगरपरिषदेचे 56 मतदार होते पोलिसांच्या वतीने मतदान केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.