ताज्या घडामोडी

कुसगाव बुद्रूक येथील प्रगतीशील शेतकरी विष्णू मराठे यांचे निधन

लोणावळा : कुसगाव बुद्रूक येथील प्रगतीशील शेतकरी व प्रसिद्ध गाडामालक विष्णू नामदेव मराठे ( वय-५९ ) यांचे शुक्रवारी ता.१२ रोजी अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिवावर भैरवनाथनगर , कुसगाव बुद्रूक येथील स्मशानभूमित शोकाकूल वातावरणात आंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. मान्यवरांनी यावेळी श्रध्दांजलीपर भाषणातून कै.मराठे यांच्या कार्याबाबत गौरवउद्गार काढले. कै.मराठे हे कुसगाव विकास सोसायटी चे सदस्य व माजी चेअरमन होते. त्यांनी बैलगाडा शर्यतीमधे अनेक घाटावर बक्षीस मिळवून नावलौकिक मिळविला होता. त्यांचे पश्चात दोन विवाहित मुलगे व दोन विवाहित मुलगी , सुना ,जावई आणि नातवंडे आसा परिवार आहे.

येथील भैरवनाथ तरूण मंडळाचे कार्यकर्ते , प्रगतीशील शेतकरी नवनाथ विष्णू मराठे व साईनाथ विष्णू मराठे हे त्यांचे सुपुञ होत. तीन महिन्यातील ही तिसरी दुःखद घटना . कै.विष्णू मराठे यांचे घरावरील ही तिसरी दुःखद घटना आहे. त्यांची आई तुळसाबाई नामदेव मराठे यांचे ता.२० आॕगष्ट २०२१ रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांची पत्नी सौ.लक्ष्मीबाई विष्णू मराठे (वय-५४ ) यांचे अकस्मिक अल्पशः आजाराने निधन झाले . वारकरी असणारे कै.विष्णू मराठे यांचे निधनामुळे कुसगाव गावावर शोककळा पसरली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!