ताज्या घडामोडी

लोणावळ्याच्या विकासात लोकसहभाग महत्त्वाचा – सुरेखाताई जाधव

लोणावळा : लोणावळ्याच्या विकासात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ स्पर्धेत राज्यात पहिला व देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. शहरात अनेक भागात चार्जिंग स्टेशन उभारली आहेत,तसेच शहरातील कचराडेपोत कच-यापासून गॕस निर्मिती ,तसेच सौरउर्जेवर विजेचे दिवे लावून पर्यावरणाचा समतोल साधला आहे. महिला व मुलींना केक ,फॕशन,डिझाईन आदी प्रशिक्षण देणाऱ्या मिरा बहुउद्देशीय संस्थेने अनेकांना प्रशिक्षण दिले आहे.त्यांना कायमस्वरूपी जागा देवू ,असे लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांनी भाषणात सांगितले .

मिरा महिला बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्यावतीने आयोजित केक ,फॕशन,डिझाईन , मेहंदी , पार्लर आदी प्रशिक्षण घेतलेल्या मुलींना नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांचे अध्यक्षतेखाली प्रशस्तिपञके प्रदान करण्यात आली.यावेळी श्रीमती जाधव बोलत होत्या .

यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी , उपनगराध्यक्षा सुवर्णा अकोलकर , नगरसेवक विशाल पाडाळे यांनीही भाषणे केली. यावेळी मिरा महिला बहुउद्देशीय सहकारी संस्थेच्यावतीने आध्यक्षा रेश्मा शब्बीर शेख यांचे हस्ते नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव ,उपनगराध्यक्षा सुवर्णा आकोलकर, श्री.पुजारी व श्री.पाडाळे यांचा सत्कार करण्यात आला.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!