ताज्या घडामोडी

देवले – औढोली रस्त्याची दुरावस्था

 

 

कार्ला : देवले – औढोली रस्त्याची अक्षरशा दुरवस्था झाली आहे. रस्त्यावरील दगड,गोटे यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. या वाहतुकीसाठी धोकादायक बनलेल्या रस्त्यावर अनेक दुचाकी घसरून पडत आहेत.

या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावरचे खड्डे चुकवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील खड्ड्यात गाडी आदळल्याने मानदुखी, कंबरदुखी या आजारांचा प्रवाशांना सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून विद्यार्थी, दुग्धव्यावसायिक, कामगार वर्ग, महिला मोठ्या प्रमाणात प्रवास करतात.

या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी देवले गावचे सरपंच महिंद्रा आंबेकर प्रयत्नशील आहेत.परंतु प्रशासन अजूनही सुस्त आहे.त्यामुळे देवले, औंढोली, डोंगरगावच्या सरपंचांना आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. रस्ता दुरुस्त न झाल्यास ग्रामस्थांसह आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!