ताज्या घडामोडी
एनसीईआर महाविद्यालयाला ‘मेक इन इंडिया इमर्जिन लीडर’ पुरस्कार
तळेगाव : नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या नूतन कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रीसर्च महाविद्यालयाला मेक इन इंडिया इन इमर्जिन लीडर 2021 हा पुरस्कार मिळाला आहे.
महाराष्ट्रातील 2021 या वर्षातील टॉप रॅकचे कॉलेज म्हणून एनसीईआरला गौरविण्यात आले. संस्थेच्या वतीने डॉ. अपर्णा पांडे यांनी आयबुक एशिया यांच्याकडून गोवा येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
संस्थेच्या संस्थाचालकांनी व पदाधिकाऱ्यांनी पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त केला.