ताज्या घडामोडी
शिवक्रांती संघटनेच्या वर्धापन दिनी छत्रपती संभाजी महाराजांचे लागणार मार्गदर्शन
लोणावळा : शिवक्रांती संघटनेचा 25 वा वर्धापन दिन वडगाव मावळ येथे भव्य कामगार मेळाव्याच्या स्वरूपात साजरा होणार आहे. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार छत्रपती संभाजी महाराज उपस्थित राहणार असून कामगारांना त्यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स याठिकाणी मंगळवार (23 नोव्हेंबर) रोजी सायंकाळी चार वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.