ताज्या घडामोडी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना लोणावळाकरांच्या वतीने श्रद्धांजली
लोणावळा : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच वयाच्या 100 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. लोणावळेकर नागरिक बाबासाहेबांना लोणावळ्यातील हॉटेल चंद्रलोक येथे सामूहिक श्रद्धांजली वाहणार आहेत.
हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण यांच्या वतीने आज सोमवार (22नोव्हेंबर) रोजी या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमी, इतिहासप्रेमी यांच्यासह लोणावळेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित रहावे असे आवाहन हिंदू समितीने केले आहे.