ताज्या घडामोडी
कार्ला येथे मावळ तालुका दिंडी समाज पालखीचे स्वागत,वारक-यांना अल्पोपहाराचे वाटप
कार्ला : संत तुकाराम महाराज झाड येथुन आज सकाळी आंळदीकडे प्रस्थान झालेल्या मावळ तालुका दिंडी समाज पालखीचे भव्य स्वागत कार्ला फाटा येथे करण्यात आले.
कार्ला फाटा येथे कार्ला ग्रांमस्थ,दुर्गा रिक्षा स्टॅन्डचे सदस्य,व पंचक्रोशीतील जेष्ठ नागरीकांच्या हस्ते विणेकरी व पालखीचे स्वागत करण्यात आले.तसेच दिंडी बरोबर आलेल्या वारकरी बंधु भगिनींना, भाऊसाहेब हुलावळे,सचिन वाडेकर,बाळासाहेब रगडे व परीवार,दिपक चौधरी,अनिल पाटारे,विशाल हुलावळे यांच्या वतीने अल्पोपाहारचे वाटप करण्यात आले.