ताज्या घडामोडी
कोरोनाचे नियम पाळत खबरदारी घ्या ; मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन
मुंबई : कोरोनाच्या नवीन ओमिक्रोन व्हेरीएंटमुळे संपूर्ण जगात चिंतेचे वातावरण आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जनतेला कोरोनाचे नियम पाळत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्टी प्रणालीद्वारे बैठक आयोजित केली होती. कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व करा. केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित बैठकीत दिले.