ताज्या घडामोडी
सं.तु.म.स.सा.कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने किर्तनाचे आयोजन
तळेगाव : संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांचा वाढदिवस 8 डिसेंबर रोजी आहे.त्या निमीत्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने ह.भ.प.इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते.
भेगडे याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हभप निवृत्ती महाराज देशमुख याच्या किर्तनास जनसमुदाय मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. यावेळेस मावळचे आमदार सुनिल शेळके यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हापरिषदचे सभापती बाबुराव वायकर, वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयुर ढोरे अतुल राऊत, दत्तात्रय पडवळ, विशाल वहिले व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.