ताज्या घडामोडी

फाईल गहाळ केल्याप्रकरणी मावळच्या तत्कालीन उपाधीक्षकावर गुन्हा दाखल

वडगाव : मूळ दस्तावरील क्षेत्र कमी करून त्याआधारे घेण्यात आलेल्या नोंदी रद्द होणे बाबत तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याने सदर प्रकरणाच्या अनुषंगाने महत्त्वाचे कागदपत्र असणाऱ्या फाईल संगनमताने फौजदारी कट रचून त्याचा पुरावा नाहीसा करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक गहाळ केल्याने मावळच्या तत्कालीन भूमी अभिलेख अधीक्षक स्मिता गौड यांच्यावर बुधवार (24 नोव्हेंबर) रोजी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मावळ भूमी अभिलेखाच्या उपअधीक्षक उर्मिला गलांडे यांनी वडगाव पोलीस स्थानकात याबाबत फिर्याद दिली होती.

पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी संगणमत करून दिनांक 14 /5 /2019 पूर्वी वडगाव मावळ भूमी अभिलेख कार्यालयाच्या हद्दीतील खंडाळा ता. मावळ येथील सर्वे नंबर 104 सिटी सर्व्हे नं 11 बाबत सह जिल्हा निबंधक वर्ग – 2 अभिलेख मुंबई या क्षेत्रीत कार्यालयामध्ये दिनांक 14/8/ 1951 रोजी नोंदणी करण्यात आलेले मूळ खरेदी दस्त क्रमांक 2607 /1951 मधील दस्तावर एकूण क्षेत्र 4 एकर 31 गुंठे मूळ क्षेत्र खोडून त्या ठिकाणी 31 गुंठे असे क्षेत्र नमूद केले. खोटे क्षेत्र नमूद असलेल्या खरेदी दस्ताची प्रमाणित प्रत हस्तगत करून त्याद्वारे नगर भूमापन लोणावळा यांच्या कार्यालयात फेरफार व नोंदी रद्द होणे बाबत अर्ज सादर केला. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते प्रकाश पोरवाल ( रा. अरिहंत अपार्टमेंट, प्रधान पार्क, लोणावळा) यांनी मूळ कागदपत्र खाडाखोड करून तो दस्त गायब करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

या अर्जाच्या आधारे प्रकरणाची पडताळणी केली असता सदर दस्त हे मावळ भुमिअभिलेख कार्यालयातून गहाळ झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मावळच्या विद्यमान भुमिअभिलेख उपअधीक्षक यांनी सदरचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक विकास सस्ते करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!