श्री डोळसनाथ महाराज देवस्थान जन्मोत्सवाची सांगता
तळेगाव : तळेगाव नगरीचे प्रसिद्ध ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज देवस्थान जन्मोत्सव सालाबाद प्रमाणे याही वर्षी उत्साहात पार पडला. श्री डोळस नाथ मंदीर ट्रस्ट,डोळसनाथ तालीम मंडळ, उत्सव समिती , भजनी मंडळे व समस्त गावक-यांनी कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला तसेच नियोजन व व्यवस्था केली.
उत्सव काळात रोजच्या मान्यवरांच्या हस्ते अभिषेक करण्यात आले. रोज सायंकाळी पाच वाजता हरिपाठ आणि सात ते नऊ किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अखंड हरिनाम सप्ताहात खालील कार्यक्रम झाले .रोज सकाळी 5 ते 7 श्री ची महापुजा ,अभिषेक व काकडा आरती भजन .दुपारी 4 वा डोळसनाथ भजनी मंडळ हरिपाठ 4.30 ते 6 वा गावातील सर्व भजनी मंडळ ची भजन सेवा सायं काळी 6.15 वा श्री ची आरती .7.00 दीप प्रज्वलन करून हरिभक्त कीर्तने झाली. त्यानंतर आलेल्या सर्वभक्तांना महाप्रसाद असे प्रकारे 20 ते 28 तारखे पर्यंत अखंड हरिनाम सप्ताह साजरा झाला.
कार्तीक कृष्ण काळाअष्टमी (कालभैरवनाथ जयंती) ला 27 नोव्हेंबर रोजी जन्मोत्सव रात्री 12.30 वा सर्व गावक-याच्या उपस्थितीत मंदिरात सपन्न झाला.या दिवशी तालुक्यातून आळंदीला जाण्यासाठी सालाबाद प्रमाणे मावळ दिंडीचे आगमन झाले .त्या दिंडीस पुणे जिल्हा फुल उत्पादकांचे अध्यक्ष शिवाजी उत्तम भेगडे व परिवार यांच्या मातोश्री कै इंदूबाई उत्तम भेगडे यांच्या स्मरणार्थ भोजन देण्यात आले.
जन्माच्या दुस-या दिवशी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 .वा महाराजांची ग्राम प्रदक्षिणा व छबिना पालखीने करण्यात आली. त्यावेळी गावातील सर्व भजनी मंडळे,गणेश मंडळे,ग्राम पुरोहीत रेडे परिवार , पुजारी गुरव परिवार व समस्त गावकरी उत्सव सोहळ्यात सहभागी झाले होते.त्यानंतर रात्री 8 वा श्री ची आरती होऊन काल्याचा अभंग म्हणून आलेल्या भक्तांना महाप्रसाद राजेश सरोदे व परिवाराकडून देण्यात आला.