ताज्या घडामोडी
थंडीच्या मोसमात पावसाची रिपरिप ; कडाक्याच्या थंडीने लोणावळेकर गारठले
लोणावळा : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यासह लोणावळा-खंडाळा परिसरात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. ह्या पावसाबरोबर तालुक्यात थंडीची लाट आली आहे. या कडाक्याच्या थंडीने लोणावळेकर गारठले आहेत.
काल बुधवारी 24 तासात शहरात तब्बल 49 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु गार वारे सुरू असल्याने थंडीची लाट मात्र कायम आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे. कडाक्याच्या थंडीने रस्त्यावर तुरळक वाहने आहेत. महत्त्वाच्या कामासाठीच नागरिक घराबाहेर पडत आहेत.