ताज्या घडामोडी
सिंहगडच्या निशा कावरेची आंतर विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी संघामध्ये निवड
लोणावळा : भारतीय जैन संघटनेच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वाघोली येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॉक्सिंग मुले व मुली स्पर्धेत सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या एन. बी नवले कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय तृतीय वर्ष बी. कॉम. मध्ये शिकत असलेल्या निशा कावरेने स्पर्धेत 45 ते 48 वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या आंतर विभागीय स्पर्धेसाठी तीची बॉक्सिंग संघातील 45 ते 48 वजन गटांमध्ये निवड झाली आहे.
या यशासाठी तिला प्रशिक्षक संतोष पडवळ यांनी अनमोल मार्गदर्शन केले. निशा कावरेच्या यशाबद्दल सिंहगड लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. एम एस गायकवाड व विद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई यांनी अभिनंदन केले.